मी "प्रणिल प्रदीप टाकळे", एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला येऊन पण आई-वडीलांनी जीवाच रान करून राजपुत्रासारखे वाढवलं. आजही त्यांनी पदोपदी केलेले संस्कार कामी येतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतो आहे.

मी माझे शालेय शिक्षण अभिनव विद्यामंदीर मध्ये पूर्ण केले आणि १२ शंकर नारायण महाविद्यालयमधून पुर्ण केले.  मी पदवीचे शिक्षण(computer science)  गोरेगावच्या पाटकर महाविद्यालय आणि पदव्युत्तर शिक्षण (Msc computer science) रामनारायण रुईया महाविद्यालय मधून पुर्ण केलं. 

जुनी गाणी ऐकणे आणि ती गुणगुणणे हा माझा आवडता छंद आहे. नवनवीन पदार्थ करून स्वतःपेक्षा इतरांना खाऊ घालायला खूप आवडते. त्याहीपेक्षा कविता करायला आवडतात.. फोटोग्राफी शिकलो नसलो तरी ती करण्यात मनाला वेगळाचं आनंद मिळतो. 

रांगोळी काढणं हे फक्त मुलींचं काम आहे असं म्हटलं जायचं. पण आज माझ्या आईमुळे मला माझी रांगोळी काढण्याची आवड जोपासता येत आहे. प्रत्यक्ष रांगोळीचे शिक्षण घेता ऩ आले तरीही मनातली जिद्द आणि आवड असल्यावर ते ही जमून जाते. ३ वर्षापूर्वीच्या आंतरमहाविद्यालयीन वर्तक कॉलेजमध्ये रांगोळी स्पर्धेत बक्षिस मिळाले आणि ते ही त्या स्पर्धेत बक्षिस मिळविणारा मी एकमेव मुलगा होतो..