डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच आमचे बापू हे माझे Mentor आहेत. बापूबद्दल बोलायचं झालं तर एक वाक्य आठवतं- "साधी राहणी पण उच्च विचारसरणी."  एक असतं ना.. Mentor should be Alrounder.. आणि तसाच माझा mentor आहे. 

प्रत्येक कलेत निपुण. एक उत्तम नर्तक.नृत्यमध्ये भारुड, गवळण, मंगळागौरी  सारखे पारंपारिक प्रकार बापूंना अस्खलितपणे येतात. उत्तम खेळाडू, कबड्डी, खोखो, क्रिकेट असे मैदीनी खेळ. उत्तम गायक, उत्तम कूक, सोप्यातल्या सोप्या पदार्थाची माहिती बापू लगेच करवून देतात. 

उत्तम लेखक, तिसरे महायुद्ध, आवाहनं न जानामि, दैनिक प्रत्यक्षमध्ये येणारे अनुनाकियांवरचे लेख उल्लेखनीय आहेत. उत्तम डॉक्टर,MD medicine असलेले बापू आजही त्याची Practise अव्याहतपणे करत आहेत. तसेच एक उत्तम गुरू.. 

गुरूवारच्या त्याच्या प्रवचनातला एक साधेपणा, समोरच्याला गोष्टी समजवण्याची धडपड आणि बोलण्यावरचे प्रभूत्व मनाला पडलेल्या प्रश्नांचे निरसन करणारे असते.  

शालेय आणि महाविद्यालयीन दिवस खूपच छान गेले आणि ते विसरणे शक्यही नाही. पण माझ्या गुरूच्या बापूंच्या शाळेतली मज्जा औरच आहे.